चांगलं वाचन माणसाला समृद्ध बनवते- वर्षा पाटोळे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालया तर्फे पुस्तक दिन साजरा करण्यात आला. यावेळी माहिती आणि तंत्रज्ञान विषयक पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन वर्षा पाटोळे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक डॉक्टर राजेंद्र माने यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी काश्मीर येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार संचालक डॉक्टर श्याम बडवे यांनी मानले.